संस्थेचे उपक्रम

शनिवार, 11 मार्च 2023, SVJJS तर्फे वाजेघर खुर्द, ता. येथील “गुंजवणी शिक्षण संस्थेच्या”, “राजगड विद्यालय” च्या विद्यार्थ्यांना 15 सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. वेल्हे . श्री. एम. डी. देशपांडे – अध्यक्ष, श्री. सतीश टांकसाळे – कोषाध्यक्ष श्री. विवेक कुलकर्णी – विश्वस्त, श्री. नितीन नवरे, श्री. नितीन कुलकर्णी – दोघेही संस्थेचे हितचिंतक आणि कार्यकर्ते; हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री. अजित कोंढाळकर सरांनी SVJJS च्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. श्री. देशपांडे साहेबांनी आपल्या भाषणात SVJJS चे संस्थापक यांच्या बलिदानाची माहिती दिली; गोवा स्वातंत्र्यलढ्यातील पद्मश्री मोहनदादा रानडे. शाळेतील दोन विद्यार्थिनींनी त्यांना शाळेत येण्यासाठी येणाऱ्या वाहतूक सुविधांबद्दल आणि आम्ही दिलेल्या सायकलच्या मदतीने त्यावर मात कशी करता येईल याविषयी त्यांच्या अडचणी सांगितल्या. कार्यक्रम खूप छान पार पडला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिसत होता.

तसेच हे सांगण्यास आनंद होत आहे की 80% सायकली विद्यार्थिनींना देण्यात आल्या आहेत.

सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार !!

============================================================

शनिवार दिनांक २१ जानेवारीस संस्थेचा स्नेह मेळावा संपन्न झाला.
ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नारायण देशपांडे, सचिव येरळा प्रोजेेक्ट सोसायटी- सांगली होते.
संस्थेने त्यांची स्मरणिका प्रकाशित केली. ह्या वर्षीचा विषय कुतूहल व संविधान आहे..

31 ऑगस्ट 2021 छत्रपती शिवाजी विद्यालयात सायकल वितरण - किकवी, तालुका भोर

Chief Guest Mr Parag Karandikar Chief Editor Maharastra times.
SnehaMelava

छात्रकल्याण योजना


या योजनेअंतर्गत गरीब हुशार विद्यार्थ्यंना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत देते हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. छात्रकल्याण योजनेअंर्गत ही मदत महाविद्यालयाची शैक्षणिक फी, भोजनाचा खर्च, वह्या-पुस्तके, बस खर्च अशा स्वरूपात असते. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन संस्थेची कार्यकारिणी विद्यार्थ्यांची निवड करते. संस्थेच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करणे शक्य झाले आहे. चांगल्या नोकऱ्या मिळवून स्थिरावलेले विद्यार्थी हळूहळू संस्थेच्या कार्यात सहभागी होऊ लागले आहेत, संस्थेचे सदस्यत्व पत्करत आहेत ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे अशा गुणी विद्यार्थ्यांचा संस्थेला अभिमानच वाटतो.

छात्रकल्याण योजनेतून विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत दिलेल्या आर्थिक मदतीचा तपशील पुढे दिला आहे.

वर्षरक्कमविद्यार्थीविद्यार्थिनीएकूण
२००१-०२१०,२५६.००१२१८
२००२-०३३३,५४२.००११२०
२००३-०४७९,९३६.००१११५२६
२००४-०५१,०८,५०४.००१७२५४२
२००५-०६१,४८,६९०.००२०२४४४
२००७-०८२,३८,११७.००२५२५५०
२००८-०९२,९२,९३१.००२९३०५९
२००९-१०३,२७,३८४.००२४३२५६
२००१०-११३,२९,३८४.००२९२४५३
२००११-१२३,२१,४६०.००२५१३३८
२००१२-१३३,२७,०४६.००३१२१५२
२००१३-१४४,५४,८४८.००२४२२४६
२००१४-१५५,०५,९२४.००२४२१४५
२००१५-१६४,९१,३१९.००१९२४४३
३१.१२.२०१६ अखेर९,०६,८२८.००२४२५४९

विद्यार्थी सहाय्य प्रक्रिया

४ जुलै २००१ पासून स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्या कार्याला सुरवात झाली. संस्थेच्या कार्यक्रमात छात्र-कल्याण योजना ही एक महत्वाची योजना आहे. शैक्षणिक मदतीची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात संस्थेकडे अर्ज करावा. अर्जात तीन महत्वाच्या गोष्टींचा सविस्तर उल्लेख असणे आवश्यक आहे – (१) विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, (२) कौटुंबिक पार्श्वभूमी आणि (३) अपेक्षित मदतीचे स्वरूप. अर्जासोबत विद्यार्थ्याने योग्य त्या गुणपत्रिका व दोन शिफारसपत्रे जोडावीत. अर्जदार विद्यार्थ्याने संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहन रानडे यांना प्रत्यक्ष भेटणे आवश्यक आहे. या भेटीमुळे संस्थेला विद्यार्थ्याचे विचार समजून घेणे शक्य होते, मात्र प्रत्यक्ष मदतीचा निर्णय अध्यक्ष्यांच्या सल्ल्याने संस्थेच्या कार्यकारिणीच्या मासिक सभेमध्ये सर्व सभासदांच्या विचार विनिमयानुसार घेतला जातो. आतापर्यंत साधारणपणे संस्थेने महाविद्यालीयन फी, वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य, बसचा खर्च, होस्टेल फी, मेसचा खर्च या स्वरूपात विद्यार्थ्यांना सहाय्य केले आहे. मात्र कोणत्याही विद्यार्थ्याला संस्था त्याचा पूर्ण खर्च देत नाही. त्याच्या खर्चाचा काही भार विद्यार्थ्याने व त्याच्या कुटुंबीयांनी उचलला पाहिजे याबद्दल संस्थेचा आग्रह आहे. संस्थेचा व लाभार्थी विद्यार्थ्यांचा संबंध फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही तर त्या विद्यार्थ्याने संस्थेच्या सभासदांना नियमितपणे भेटून शैक्षणिक प्रगतीची कल्पना द्यावी. वक्तृत्व, लेखन, नृत्य, नाट्य, क्रीडा या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांची प्रगतीही संस्था लक्षात घेते. विद्यार्थ्यांना योग्य क्षेत्र निवडण्यासाठी सल्ला देणे, निरनिराळ्या क्षेत्रात वाव देणे, अर्थाजनासाठी उपलब्ध करून देणे इ. प्रयत्न संस्थेचे सभासद करीत असतात. मात्र हे सर्व विसरून न जाता विद्यार्थांनी पुढील जीवनात छात्र कल्याण संकल्प स्वतः सुरु ठेवावा व गुणवान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करावा अशी संस्थेची अपॆक्षा आहे. छात्र कल्याण योजनेबरोबरच संस्थेची दुसरी महत्वाची योजना म्हणजे ‘महिला सबलीकरण’. गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी संस्थेकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. व्यवसायातील आर्थिक प्राप्तीतून महिला घेतलेल्या रकमेची परतफेड करतात. संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी या मदतीचा उपयोग होतो. शिवणकाम, हस्तकला, भाजी विकणे, खाद्यपदार्थ व मसाले तयार करून विकणे, स्वयंपाकाचे डबे देणे इ. कामांसाठी स्त्रियांना याचा लाभ घेता येतो.