

पद्मश्री मोहनदादां रानडे
स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था या सेवाभावी संस्थेची स्थापना कै. पद्मश्री मोहन रानडे यांनी पुण्यात २००१ साली केली.
पोर्तुगीज तुरुंगातून सुटका झाल्यावर १९६९ पासून मोहन दादांनी गोव्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले.
१९९९ मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले व २००१ पासून त्यांनी स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली.
समाजातील वंचित, दुर्बल घटक, महिला व विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वबळावर जीवन जगण्यासाठी उद्युक्त करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
विद्यार्थ्यांना फी, पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य, बस पास, वसतिगृह, खानावळ इ. साठी आर्थिक मदत दिली जाते.
स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे ध्येय आहे “मला माझ्या बांधवांना मदत करु दे“.
कामाची सुरुवात विद्यार्थ्यांना मदत करुन झाली
