पद्मश्री मोहनदादा रानडे स्मृति ग्रंथ

This image has an empty alt attribute; its file name is image-1-1024x533.png
स्व.पद्मश्री मोहनदादा रानडे, संस्थापक, स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था, पुणे

गोवा मुक्तीसंग्रामातील क्रांतीवीर कै. मोहन रानडे हे जवळपास चौदा वर्षे पोर्तुगीजांच्या कारावासात होते. लिस्बनहून या दीर्घ करावासातून सुटका झाल्यावर १ फेब्रुवारी १९६९ रोजी ते मुंबई विमानतळावर उतरले, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

या अभूतपूर्व स्वागताचे वर्णन करताना मोहन रानडे यांनी म्हटले आहे-
“विमानातून उतरण्यासाठी मी विमानाच्या दारापर्यंत पोचलो, तोपर्यंत एकजण पायऱ्या चढून आले, आणि त्यांनी विचारले, ‘रानडे?’

“हो, तो मीच!’ मी म्हटले. ते गृहस्थ मागे वळले. दाराजवळ गेले, त्यांनी हात उंचावला आणि “मोहन रानडे की जय!’ असा जयघोष माझ्या कानावर आला.

माझ्या देशबांधबांनी केलेल्या या जयजयकाराने मी भारावून गेलो. ‘भारतमाताकी जय!’ मी उच्चरवात घोषणा दिली.

त्यांनी केलेल्या स्वागताला हे माझे उत्तर होते. पाठोपाठ ‘भारतमाताकी जय! ‘ असा प्रतिध्वनी ‘शतमुखातून उमटला, ‘

हीच घोषणा देत १५ ऑगस्ट १९५५ रोजी भारताच्या कानाकोपन्यातून आलेले हजारो सत्याग्रही गोव्याच्या सीमेवरून गोव्यामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते – पोर्तुगीज पोलिसांच्या गोळीबाराला न घाबरता! त्या दिवशी या घोषणेने लढ्याला तोंड फोडले होते.

आज गोव्याच्या स्वातंत्र्याचा लढा आपण जिंकला असला तरी येथील सामान्य जनतेला अज्ञानाच्या जोखडातून मुक्त करण्याचा लढा मात्र अद्यापि सुरू आहे.

आपल्या ‘Struggle Unfinished’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मोहनदादांनी म्हटले आहे-

“डिसेंबर १९६९ मध्ये माझे आत्मकथन मराठीमध्ये ‘सतीचे वाण’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिध्द झाले. तर १९७२ मध्ये ‘सरफरोशीकी तमन्ना’ या नावाने त्याची हिंदी आवृत्ती प्रसिध्द झाली. ‘

‘Struggle Unfinished’ हे पुस्तक म्हणजे केवळ या आत्मकथनाचा इंग्रजी अनुवाद नसून ‘त्यापलिकडेही काही आहे……

ही गोष्ट होती १९८८ मधील….. ते पोर्तुगालमधून परतल्यानंतर गोव्यात स्थायिक झाल्यानंतरची!

१९६९ नंतरचा कालखंड दाखविण्यासाठी त्यांनी या पुस्तकात कोणतेही नवीन प्रकरण ‘वाढविलेले नाही.

या पुस्तकात गोव्याचा मुक्तीसंग्राम, गोव्यातील लोक, पोर्तुगीजांनी बसविलेली राजकीय घडी आणि इतर पोर्तुगीज वसाहतींचा स्वातंत्र्यलढा याबद्दल वाचायला मिळते.

१९४९ ते १९६९ या वीस वर्षांच्या कालखंडाचे चित्रण या पुस्तकात येते. १९४९ पूर्वी क्रांतीकारक होण्याचा या युवकाचा प्रवास, तसेच १९६९ नंतरचा वृत्तांत / लेखा-जोखा ह्या पुस्तकात नाही.

तो ‘Struggle Unfinished’ – अपुरी राहिलेली झुंज’, १९६९ नंतर स्वतंत्र गोव्यातील त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.

गोव्याचे तेव्हाचे राज्यपाल डॉ. गोपालसिंग यांनी म्हटले आहे – ‘मी १९८४ मध्ये गोव्यात आल्यानंतर मोहन रानडे यांच्याशी माझी ओळख झाली. स्वातंत्र्यैनिक म्हणून ते महान होतेच, पण तळागाळातल्या, गरीब जनतेच्या प्रगतीसाठी निष्ठेने झटणारा सामाजिक कार्यकर्ताही त्यांच्यामध्ये होता.’

चिंबलमध्ये मोहनदादांनी १९८६ मध्ये ‘महिला ब बालक कल्याण गृह’ स्थापन केले. गोरगरीबांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी स्वतःला वाहन घेतले.

तरूण वयापर्यंत त्यांचे देवत, त्यांचा आदर्श होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी म्हटले आहे ‘की विद्यार्थीदशेत असताना आम्ही हातखर्चाला मिळालेले किंवा भेट म्हणून मिळालेले पैसे क्रांतीकारकांची पुस्तके विकत घेण्यासाठी बापरत असू. नाहीतर ब्रिटींशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी सुरे-चाकू विकत घेत असू. खरे तर हा सगळा पोरकटपणाच होता, पण त्या पोरकटपणामागेही मोठा अर्थ होता..!

१९६९ मध्ये स्वतंत्र गोव्यात परतल्यानंतर मोहन दादांनी तळागाळातल्या गरीब जनतेसाठी ‘अपुरी राहिलेली झुंज – ‘Struggle Unfinished’ पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव मोहनदादांवर पडायला लागला होता.

‘मोहनदादांच्या संपूर्ण जीवनाचा म्हणजे डिसेंबर १९३0 पासून जून २0१९ पर्यंतच्या त्यांच्या संबंधीच्या आठवणींबद्दलचे पुस्तक आम्ही प्रसिध्द करणार आहोत.

या महान क्रांतिकारकाच्या संदर्भातील काही आठवणी आपल्याजवळ असतील, तर त्या जरूर आमच्याकडे पाठवा, अशी आपल्याला नम्र विनंती आहे.

धन्यवाद !!